SIP आणि RD मध्ये फरक - कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य?
आजकाल गुंतवणूकीबाबत जागरूकता वाढल्यामुळे अनेक लोक आपल्या भविष्यासाठी शहाणपणाची बचत आणि गुंतवणूक करण्याचा विचार करतात. मात्र, गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे योग्य पर्याय निवडताना गोंधळ होतो. SIP (Systematic Investment Plan) आणि RD (Recurring Deposit) हे दोघेही नियमित बचतीसाठी वापरले जाणारे लोकप्रिय आहेत. पण SIP आणि RD मध्ये फरक काय आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
SIP म्हणजे काय?
SIP (Systematic Investment Plan) हा एक प्रकारचा म्युच्युअल फंड गुंतवणूक पर्याय आहे ज्यात तुम्ही दर महा ठराविक रक्कम गुंतवता. SIP मधून तुमची रक्कम विविध इक्विटी, डेट किंवा हायब्रीड फंडामध्ये गुंतवली जाते.
SIP चे फायदे:
- मार्केटमध्ये वाढ असल्यास चांगले रिटर्न्स मिळतात
- कंपाउंडिंगचा फायदा
- महागाईवर मात करण्याची क्षमता
- लवचिकता - रक्कम वाढवणे/कमी करणे सोपे
RD म्हणजे काय?
RD (Recurring Deposit) हा बॅंकद्वारे दिला जाणारा पारंपारिक बचत पर्याय आहे ज्यात तुम्ही दर महा ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी जमा करता. कालावधी संपल्यावर तुम्हाला मुदत ठेवीप्रमाणे व्याजासह पैसे परत मिळतात.
RD चे फायदे:
- स्थिर आणि हमखास रिटर्न्स
- जोखीम नाही
- सर्वसामान्यांसाठी उपयुक्त
- सहज उपलब्ध
SIP आणि RD मध्ये फरक (SIP vs RD Comparison)
बाब SIP RD
- व्याज/रिटर्न बाजारावर अवलंबून, जास्त शक्यता निश्चित, 5-7% दरवर्षी
- जोखीम थोडी असते नाही
- लवचिकता जास्त, कधीही थांबवता येते मर्यादित
- करसवलत ELSS फंड घेतल्यास लाभ काही प्रमाणात 80C अंतर्गत
- कालावधी कमी ते जास्त लवचिक 6 महिने ते 10 वर्षे
- महागाईवर मात शक्य नाही
विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय योग्य?
जर तुम्ही विद्यार्थी किंवा नवशिके गुंतवणूकदार असाल, तर RD हा सुरक्षित पर्याय असू शकतो. पण SIP द्वारे तुम्ही थोड्याशा जोखमीच्या बदल्यात जास्त परतावा मिळू शकता. दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक कराल, तर SIP हा उत्तम पर्याय ठरतो.
SIP सुरू करण्याची प्रक्रिया:
- म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म निवडा (जसे Zerodha Coin, Groww)
- KYC प्रक्रिया पूर्ण करा
- SIP फंड निवडा (Large Cap, Mid Cap, ELSS इ.)
- रक्कम ठरवा (उदा. ₹500 प्रति महिना)
- ऑटो डेबिट सेट करा
RD सुरु करण्याची प्रक्रिया:
- बॅंकेत खाते असणे अवश्यक
- नेट बॅंकिंग/ मोबाईल ॲप द्वारे सुरु करता येते
- ठराविक रक्कम आणि कालावधी निवडा
- ऑटो डेबिट सेट करा
निष्कर्ष:
SIP आणि RD मध्ये फरक समजून घेतल्यानंतर तुमच्या गरजा, जोखीम क्षमतेनुसार योग्य पर्याय निवडावा. जास्त रिटर्न हवे असल्यास SIP निवडा, आणि सुरक्षिततेला प्राधान्य असल्यास RD योग्य ठरेल.
Information in English
Difference between SIP and RD - Which option is right for you?
Nowadays, due to increased awareness about investment, many people are thinking of saving and investing wisely for their future. However, with so many investment options available, it becomes confusing to choose the right option. SIP (Systematic Investment Plan) and RD (Recurring Deposit) are both popular options used for regular savings. But it is important to understand the difference between SIP and RD.
What is SIP?
SIP (Systematic Investment Plan) is a type of mutual fund investment options in which you invest a fixed amount every month. Through SIP, your money is invested in various equity, debt or hybrid funds.
Advantages of SIP:
- Good returns if the market increases
- Advantages of compounding
- Ability to beat inflation
- Flexibility - Easy to increase/decrease the amount
What is RD?
RD (Recurring Deposit) is a traditional savings option by banks in which you deposit a fixed amount every month for a fixed period. After the period ends, you get your money back along with interest like a fixed deposit.
Advantages of RD:
- Stable and guaranteed returns
- No risk
- Suitable for everyone
- Easily available
Difference between SIP and RD (SIP vs RD Comparison)
About SIP RD
- Interest/returns Depend on the market, more likely fixed, 5-7% per annum
- Low risk Now
- High flexibility, can be stopped at any time limited
- Tax exemption if you buy ELSS funds, some benefits under 80C
- Tenure Short to more flexible 6 months to 10 years
- Cannot beat inflation
Which options is right for students?
If you are a student or a novice investor, RD can be a safe option. But through SIP, you can get higher returns in return for a little risk. If your are investing with a long term perspective, SIP is a good option.
SIP Starting Process:
- Choose a Mutual Fund Platform (like Zerodha Coin, Groww)
- Complete the KYC process
- Select a SIP Fund (Large Cap, Mid Cap, ELSS, etc.)
- Decide on the amount (eg.₹500 per month)
- Set up auto debit
RD Starting Process:
- Must have a bank account
- Can be started through net banking/mobile app
- Choose a specific amount and tenure
- Set up auto debit
Conclusion
After understanding the difference between SIP and RD, you should choose the right option according to your needs and risk tolerance. If you want higher returns, choose SIP, and if Safety is a priority, RD will be suitable.
Post a Comment