WhatsApp चे १५ गुपित फीचर्स जे तुम्हाला माहितीच नाहीत!
आजच्या डिजिटल जगात WhatsApp हे प्रत्येकाच्या मोबाईल मधील खुप महत्वाचं App झालं आहे. आपण रोज कित्येक मेसेज,फोटो, व्हाईस कॉल्स आणि व्हिडीओ कॉल्स करत असतो. पण या App मध्ये काही गुप्त किवा लपलेले काही फीचर्स आहेत, जी खूप लोकांना माहिती नसतात.
या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत की WhatsApp चे १५ भन्नाट फिचर्स जे तुमचा अनुभव अधिक चांगला आणि स्मार्ट बनवतील. WhatsApp ची फीचर्स
१. फिंगरप्रिंट लॉक वापरा - तुमचे चॅट सुरक्षित ठेवा
तुमच्या वैयक्तिक चॉट्सना कोणीही उघडून वाचू नये अस वाटतंय का? मग WhatsApp मध्येच फिंगर प्रिंट लॉक टाका.
कसे कराल;
- सेटिंग > प्रायव्हसी > फिंगर प्रिंट लॉक
- Iphone वापरत असल्यास : सेटिंग्स > प्रायव्हसी > स्क्रीन लॉक
२. एखाद्या चॅटला वेगळा लॉक लावा
नवीन WhatsApp अपडेटमध्ये आता तुम्ही एका विशिष्ट चॅटला लॉक लावु शकता.
कसे करायचे :
- चॅट उघडा > वरच्या नावावरती टॅप करा > Chat Lock निवडा > लॉक Active करा
- हे चॅट आता Locked Chats मध्ये जाईल.
३. चॅट शॉर्टकट होम स्क्रीन जोडा
ज्या लोकांशी तुम्ही नेहमी बोलता, त्यांचे चॅट्स तुम्ही होम स्क्रीन वर शॉर्टकट म्हणून ठेवू शकता.
कसे कराल :
- चॅट वर लॉन्ग प्रेस करा > तीन डॉट्स > Add Shortcut
४. पाठवलेला मेसेज एडिट करा
जर चुकून काही चुकीचा मेसेज गेला असेल, तर आता तुम्ही तो १५ मिनिटांत एडिट करून शकता. WhatsApp ट्रिक्स मराठीत
कसे कराल :
- मेसेजवर लॉन्ग प्रेस करा > Edit वर टॅप करा
५. स्वत:लाच मेसेज पाठवा
WhatsApp मध्ये आता "Message YourSelf" हे नवीन फीचर आले आहे, ज्याचा वापर तुम्ही नोट्स, लिंक, डॉक्युमेंट्स सेव्ह करण्यासाठी करु शकता.
कसे वापराल :
- New Chat > Message YourSelf वर क्लिक करा
६. WhatsApp अनेक डिव्हाइसेवर वापरा
तुमचा मोबाईल इंटरनेटवरती नसतानाही तुम्ही आता WhatsApp वेब, डेस्कटॉपवर किंवा दुसर्या फोनवर वापरू शकता.
कसे कराल :
- सेटिंग्ज ओपन करा > Linked Devices > Link a Device
७. Communities वापरा
WhatsApp ची Communities ही एक खास फीचर्स आहे. यात तुम्हाला वेगवेगळ्या ग्रुपसना एकत्र ठेवू शकता.
उदाहरण: जर तुम्ही क्लासेस चालवत असाल, तर प्रत्येक बॅचचा ग्रुप वेगळा एकत्र Community तयार करू शकता. WhatsApp लपलेली फंक्शन्स
८. चॅट साठी वेगळा टोन सेट करा
तुम्हाला कोणाचा मेसेज आलाय हे तुम्हाला आवाजानुसार ओळखता येईल.
कसे कराल :
- चॅट उघडा > नावावर टॅप करा > Custome Notifications
९. Online स्ट्रेस लपवा
तुम्हाला Online असल्याचं कोणी पाहु नये का वाटतंय का? मग हे फीचर वापरून पहा.
कसे कराल :
- सेटिंग्ज ओपन करा > Privacy > Last Seen & Online
- इथे तुम्ही "My Contacts Except" निवडू शकता. WhatsApp टिप्स मराठीत
१०. महत्त्वाचे मेसेज 'Star' करून ठेवा
कोणत्याही महत्वाच्या मेसेजला तुम्ही Star करून ठेवू शकता, म्हणजे तो नंतर सहज सापडू शकतो
कसे कराल :
- मेसेजवर लॉन्ग प्रेस करा > Star निवडा
- नंतर Menu > Started Message मध्ये पहा
११. Dark Mode वापरा
डार्क मोड डोळ्यांवर ताण व त्रास होऊ देत नाही आणि बॅटरीही वाचवतो.
कसे Active कराल :
- सेटिंग्स > Chats > Theme > Dark
१२. Storage मॅनेज करा
WhatsApp मध्ये तुम्ही कोणते फोटो, व्हिडिओ, यांनी किती जागा घेतली आहे ते पाहू शकता.
कसे पाहाल :
- सेटिंग्ज > Storage & Data > Manage Storage
१३. Voice मेसेज आता टेक्टमध्ये बदला
नवीन AI अपडेट मुळे आता तुम्ही WhatsApp चे व्हॉइस मेसेज टेस्टमध्ये Convert करु शकतो (हळूहळू सर्वांना मिळणार)
१४. एकांत वेळी अनेक लोकांना कॉल करा
Voice किंवा Audio कॉलममध्ये आता तुम्ही एकावेळी ३२ लोकांपर्यत कॉल करु शकता.
कसे कराल :
- कॉल टॅप > नवीन कॉल > New Group Call
१५. काही चॅट्स सायलेंट करा
कोणीतरी खूप मेसेज करत असेल, पण ब्लॉक करायचं नसेल, तर ते चॅट म्यूट करा.
कसे कराल :
- चॅट वर लॉन्ग प्रेस > Mute Notifications
- ८ तास, १ आठवडा किंवा कायमचा Mute निवडा.
- WhatsApp सुरक्षितता
तुम्हाला अजून अशाच उपयुक्त टिप्स आता ट्रिक्स हवे असतील, तर हा ब्लॉग नक्की फॉलो करा आणि शेअर करा.
Post a Comment